Blog Archive
Home » Marathi » Maagevalun Paahtana
Maagevalun Paahtana
आज म्हटले जरा भूतकाळात डोकावून पाहावे, म्हणून इतके दिवस जपलेली आठवणींची 'कूपी' उघडली तर एक मजेदार किस्सा नजरेसमोरून तरळून गेला.
मला आठवते, ते माझे अभियांत्रिकीचे शेवटचे वर्ष होते. 'Campus'भर 'gathering' आणि 'cultural
activities' च्या 'चर्चा' आणि 'हालचालींनी' वेग घेतला होता. आमचे 'department' या बाबतीत नेहमीप्रमाणे जरा 'सूस्त'च होते, ही आमची 'परंपरा'च होती जणू!आणि दरवर्षी अशा कार्यक्रमांत आम्हां 'टोळक्यांची' भूमिका 'performers'ना त्रास देणाऱ्या 'हुल्लड' प्रेक्षकांची असायची.
कळविण्यात आले की, 'instrument playing'स्पर्धेने या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. आणि जो-तो वाद्ये गोळा करणे आणि 'performance'साठीच्या 'themes' सजविण्यात गढून गेला.
आमच्याकडे 'instruments' तर सोडाच, 'ते वाजवणार कोण?' हाच यक्षप्रश्न होता. पण स्पर्धेच्या आदल्या रात्री 'typical engineer style' ने आमच्या department cultural activity प्रमुखांनी 'या' दोन्हींचा 'शोध' लावला.
परंपरेने 'ना'कारलेला 'साकेत अभ्यंकर' तबलावादक तर नेहमीच अशावेळी लपाछपी खेळणारा
'लाजाळू'(काही नाही 'गैरसमज' आहे हा) 'अमोल बेणारे' बासरी व 'mouth-organ' अशा 'दुहेरी' भूमिकेत अवतरणार होता.
परंपरेने 'ना'कारलेला 'साकेत अभ्यंकर' तबलावादक तर नेहमीच अशावेळी लपाछपी खेळणारा
'लाजाळू'(काही नाही 'गैरसमज' आहे हा) 'अमोल बेणारे' बासरी व 'mouth-organ' अशा 'दुहेरी' भूमिकेत अवतरणार होता.
कुठून कुणास अशी 'कुणकुण' लागली की आमच्याकडे 'harmonium'वादकही आहे आणि हा 'काटेरी' मुकूट माझ्या डोक्यावर ठेवण्यात आला. हुश्श! आम्ही तीन नमुने सोडले तर बाकी सगळ्यांचा जीव अगदी भांड्यात पडला. आता खरी कसोटी होती. साकेत सोडला तर मी आणि बेणारेने कधी 'stage' चढायचीही 'daring' केली नसल्याने बुजलेलो होतो.
तयारी करायची होती. कुठे माशी शिंकली कुणास ठावूक, आणि 'त्या' रात्री आम्ही 'ढापलेले' harmonium न्यायला दुसऱ्या departmentची 'धाड' पडली. आता कसली 'डोंबलाची' तयारी(माझे स्वगत!). "रात्र वैऱ्याची असते" या उक्तीचा 'अनुभव' प्रथमच घेत होतो. काय वाजवायचे हेही नीटसं न ठरवता आणि उद्या स्पर्धेलातरी harmonium मिळेल या आशेवर आम्ही 'good night ' म्हटलं.
साकेतचा काही प्रोब्लेम नव्हता कारण आम्ही ऐकलं होतं की तो तबल्यावर अगदी 'कहो ना प्यार है' ही वाजवतो म्हणून! प्रश्न होता तो फक्त माझा आणि बेणारेचा. आम्हाला खरंच वाजवताही येते की नाही, हे अजूनही गुलदस्त्यातच होतं. बेणारेने तर तुटलेलं mouth-organ दुरुस्त करण्यापासून सुरुवात केली होती. दोन-चार मोठाले screw बसवून निदान 'एकटा' बेणारे तरी ते हातात पकडू शकतो या बेताने आम्ही त्याला 'fix' केला.
आज स्पर्धेचा नव्हे तर निदान आमच्यासाठी तरी 'लढाई'चा दिवस होता. मला आठवते, त्याच दिवशी आमच्या अद्याप सुरूही न केलेल्या final year project ची 'status meeting' होती. स्पर्धा पाच वाजता सुरु होणार होती. या वेळेपर्यंतही practice करण्याचा कोणताही मोह आम्हा 'महाभागांना' अगदी शिवलाही नाही. आणि करणार तरी कसे नं! चार वाजेपर्यंत तर आम्ही तुमची काय म्हणतात ती 'brain storming' करत होतो. साडेचार वाजता आमची status meeting 'schedule' झाली. तिकडे दर दहा मिनिटांनी आम्हाला स्पर्धेत हजर राहण्यासाठी 'ultimatum ' देण्यात येत होता. इतक्यात 'साकेत म्हामुणकर' धावत-पळत थेट मीटिंग रूममध्ये घुसला आणि चक्क department head समोर आम्हा तिघांना अक्षरशः फरपटत 'auditorium'मध्ये घेऊन गेला. असल्या 'स्टंटबाजीत' आमचा 'क्लास' आम्ही अगदी 'राखला' होता.
ज्याप्रकारे आम्हा तिघांना स्टेजवर फेकण्यात आले, मला तर आफ्रिकेतले 'गांधीजी' आठवले. स्टेजवरून समोर बघायची हिम्मत होत नव्हती.
आम्ही अगदी हिंदी चित्रपटातल्या नायकाप्रमाणे अगदी त्वेषाने उठून,
तिथे पडलेली आपापली वाद्ये उचलली आणि बैठकीवर बसलो. मी फक्त harmonium उघडलीच होती, तोच 'ओंकार', प्रेक्षकांत बसलेला आमचा मित्र ओरडला, "शाब्बास, Computers"!!! फक्त 'harmonium ' उघडण्यासाठी तर ही 'दाद' नव्हती नं! क्षणभर माझे डोळे चमकले आणि ऊर अगदी भरून आला. बेणारेला तर तिकडे डरडरून घाम फुटला होता. साकेत अभ्यंकर आम्हा दोघांच्या मधे बसला होता. बेणारेला tension होते, त्याने फुंकलेल्या हवेने बासरी, ऑर्गन वाजतील का नाही?
आम्ही अगदी हिंदी चित्रपटातल्या नायकाप्रमाणे अगदी त्वेषाने उठून,
तिथे पडलेली आपापली वाद्ये उचलली आणि बैठकीवर बसलो. मी फक्त harmonium उघडलीच होती, तोच 'ओंकार', प्रेक्षकांत बसलेला आमचा मित्र ओरडला, "शाब्बास, Computers"!!! फक्त 'harmonium ' उघडण्यासाठी तर ही 'दाद' नव्हती नं! क्षणभर माझे डोळे चमकले आणि ऊर अगदी भरून आला. बेणारेला तर तिकडे डरडरून घाम फुटला होता. साकेत अभ्यंकर आम्हा दोघांच्या मधे बसला होता. बेणारेला tension होते, त्याने फुंकलेल्या हवेने बासरी, ऑर्गन वाजतील का नाही?
मी वाजवायला सुरुवात केली तशी आमचे प्रेक्षकांत जाणूनबुजून पेरलेले मित्र टाळ्या आणि शिट्ट्या वाजवू लागले. इतक्यात साकेत दबक्या आवाजात पण जरा दरडावूनच, मला खुणावू लागला, "दऱ्या, हे नाही दुसरं गाणं आहे, तू हे काय वाजवतोयस?"
टाळ्यांनी भारावून गेल्याने मी माझ्याच 'तंद्रीत' होतो. तेवढ्यात तबल्यावर मारायची 'थाप' त्याने माझ्या मांडीवर मारली आणि मी 'भानावर' आलो. या गोंधळातच, तिकडे बेणारे इतकावेळ पोटात साठवून ठेवलेली हवा 'फुंकणी' पद्धतीने बासरीत भरत होता. आमचे मित्र टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून 'चोख' भूमिका बजावत होते. अशाने आमचं काय चाललंय आम्हालाच कळत होते. परीक्षकांना ऐकू न जावे यासाठी तर एवढा अट्टाहास होता. अर्धातासभर चाललेला स्टेजवरचा आमचा 'सावळा गोंधळ' time-up च्या buzzer ने थांबला.
अगदी 'विजीगिषु' मिजाशीत आम्ही स्टेजवरून खाली आलो आणि आम्ही मित्रांमध्ये मिसळताच सगळ्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला. आम्ही स्पर्धेचे कोणतेही बक्षीस मिळवले नसले तरी ते गमावल्याचीही कोणतीही लाज न बाळगण्याइतके 'निर्लज्ज' तर आम्ही नक्कीच होतो.
इतक्यावर्षांची हीच तर एकमेव 'दौलत' आमच्याकडे होती...
Cheers!!!!
Sunday, January 08, 2012
|
Labels:
Darekars,
Ek Aathvan,
Marathi
|
Subscribe to:
Post Comments (Atom)
Tags
Blogumulus

16 comments:
hey nice one.........ya sukhad aathvaninnach kadchit aayushya mhantat
तोडलास मित्र.....Zakasssssssssssssssss....
संतोष ... अप्रतिम लेख मित्रा. त्या स्पर्धेनंतर आपण सगळे जण बाहेर नाचलो होतो ... आठवतय ? सोनेरी दिवस ..... ह्या लेखाने खुप आठवणी ताज्या झाल्या.
Ossam Partner....Like it...
ekdum zakas..Tuzytala lekhak jaga zala ahe watat...:)
संतोष मित्रा अप्रतिम रे...
कोठून शिकलास हे एवढे ...
आपण ३ वर्षे रत्नागिरीच्या कर्मभूमीत एकत्र होतो पण तुझ्यासारख्या परिसाचा आम्हा लोखंडवर (भंगार च म्हणा ना) मात्र काहीही परिणाम नाही झाला.
अखंडितपणे खळखळ वाहणाऱ्या निर्मळा सारखा तू, खूप काही शिकता आले असते तुझ्याकडून ... पण नाही..
पोरीन्मागे धावण्यात आणि खेळण्यात आम्ही व्यर्थ गेलो ...
सलाम ... तुला..
असाच राहा... इतरांना हवाहवासा वाटणारा ... आनंदी... हुशार ... खट्याळ... संतोषी..
तुझ्यासाठी २० खांडेकरांच्या ४ ओळी ...
..............
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही !
मानवाचे मन केवळ भूतकाळच्या साखळदंडनी करकचून बांधून ठेवता येत नाही !
त्याला भविष्याच्या गरुडपंखांच वरदानही लाभलेलं आहे...
एखाद स्वप्न पहान, ते फुलविण, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडण, त्या धडपडीतला आनंद लुटण आणि दुर्दैवान ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी मनाचा धर्म आहे.
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळे. !!! ....
Thanks Hemant. Mazi stuti 'jara' jastch kelis asa nahi vatat ka tula? ;)
Nahi, Mazi evdhi layki nahi.. Pan mi 'aathvaninna' shabdanvaye vaat karun dyaycha prayatn kela aahe itkach...;)
its realy mind blowing heart touching I like it
mitra tumchya colagat navato me...... pan je varnan kela te akdam jiv laun lihilayas ..... evdhach mhanen.... "shabhhass COMPUTERS :)"
nahi
-----hemant
मित्रा हेमंत, बरे झाले स्वतःला भंगार म्हणालास!!!
रत्नागिरी मध्ये तुम्ही लावलेल्या दिवांच्या प्रकाशातच आम्ही अभ्यास केला आहे (:P)
-
-
बाकी मित्रा संतोष तोडलस रे !!!
फक्त एक गोष्ट खटकली "निर्लज्ज" पणाची दौलत तुला अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात मिळाली ते .....!!!
-
तुमचा जुनियर - सौरभ
Thanks सौरभ....
मी असं लिहिलं आहे की, "इतक्यावर्षांची हीच तर एकमेव दौलत.............." :)
बर बर - मिसअंडरस्टूड ....
-
कीप रायटिंग!
Hey Sandy, nicely quoted ur memories.. Mast hai yaar.. Looking for more update for our glories College days..
Post a Comment
I would be grateful to you, if you leave your comments/suggestions here. It would help me to improve before publishing new.
Thanks in advance.